Breaking News

हे सरकार फेकूगिरी आणि गाजर दाखवणारे : अजित पवार

मुंबई : नुकत्याच झालेल्या नगरपंचायत पोटनिवडणूकांमध्ये कमळाबाईला तीन नंबरवर समाधान मानावे लागले आहे. लोकांना आता कळू लागले आहे की,हे सरकार फेकूगिरी क रणारे आहे,गाजर दाखवणारे सरकार आहे, अशी टीका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भोसरीच्या जाहीर सभेत केली.


भोसरी, पिंपरी-चिंचवड, पुणे भागांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी विशेष नाते आहे. त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहिलो असे सांगत राष्ट्रवादी का ँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आस्थेवाईकपणे भोसरी येथील उपस्थित समुदायाची मनं जिंकली. हल्लाबोल आंदोलनातील नवव्या दिवशी शेवटची जाहीर सभा भोसरी येथे प्रचंड अशा जनसमुदायासमोर पार पडली. यावेळी पवार सभेला संबोधित करत होते. पवार पुढे म्हणाले की, आज या परिसरात कचर्‍याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे, गुंडगिरी इथे वाढली आहे, ज्येष्ठ नागरिकांना येथे स्वतंत्रपणे वावरता येत नाही, अनेक समस्या आहेत, पण सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. या भागाच्या पाण्याच्या मीटिंगला मी उपस्थित होतो, आयुक्त उपस्थित होते, मात्र आमदार, नगरसेवक, कोणी उपस्थित नव्हते. आपल्या भागाच्या पिण्याच्या पाण्याच्या विषया व्यतिरिक्त कोणते काम महत्त्वाचे आहे ? असा सवाल त्यांनी केला.