Breaking News

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या वतीने कार्यक्रम

श्रीरामपूर (वार्ताहर)- नगरपरिषदेच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने शनिवार दि. 7 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी 5 वाजता ख्यातनाम सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड यांचा ‘माझ्या आयुष्यात भेटलेल्या लेकी व सुना या विषयावर त्या व्याख्यान देणार आहेत. तसेच रविवार दि.8 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता महिलाच्या आरोग्याविषयी प्रसिद्ध डॉ. उषा पंतवैद्य व डॉ. सरिता देशपांडे यांचे प्रश्‍नमंजुषाचा कार्यक्रमाचे आयोजन स्वयंवर मंगल कार्यालय येथे करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांंनी दिली.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा आदिक यांनी केले असून या निमित्ताने शहरातील व ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाने बनविलेले विविध प्रकारची खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तुंचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात येणार असून त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने शहरातील तीन विविध क्षेत्रात कामगिरी करणा्या महिलांचा सन्मान यावेळी केला जाणार आहे.
या कार्यक्रमानिमित्ताने महिलांसाठी ऑन दि स्टॉप प्राईजेस (भव्य लकी ड्रॉ) ठेवण्यात आला आहे. तसेच फन फुड मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यानिमित्ताने सध्या शहरात आकर्षण ठरलेल्या जागतिक किर्तीच्या जादूगर आँचल ही आपल्या जादूचे प्रयोग या ठिकाणी सादर करण्यात आहे. यासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रमची ठेवण्यात आले असल्याची माहिती नगरध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिली. जागतिक महिला दिनानिमित्ताने 7 व 8 एप्रिल रोजी स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यासह मुख्याधिकारी सुमंत मोरे यानी केले आहे.