Breaking News

लोकसंख्या कायदयाला बगल हे कारस्‍थान : चव्‍हाणके


कोपरगाव ता. प्रतिनिधी  - संविधान लिहिल्‍यानंतर भारततरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसंख्येबाबत ठोस निती करा, असा आग्रह धरला होता. मात्र त्‍याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले गेले. देशात ध्वनीप्रदूषण, उत्‍सवाची वेळ व काल मर्यादा याबाबतचे लहान लहान कायदे होतात. पण स्‍वातंत्र्याच्‍या ७० वर्षानंतरही भारतात लोकसंख्याबाबत कायदे होत नाहीत, हे एक षडयंत्र आहे. लोकसंख्या कायदयाला जी बगल दिली गेली, हे ठरवून केलेले कारस्‍थान आहे, असा आरोप ‘भारत बचाओ महा रथयात्रा’ अभियानाचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी केले.

कोपरगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्र निर्माण अभियानच्‍या 'हम दो हमारे दो तो सबके दो' चा नारा देत १८ फेब्रुवारी रोजी जम्‍मू येथून सुरू झालेली ७० दिवसांची भारत बचाओ महा रथयात्रा २० हजार किलोमीटरचा प्रवास करून बुधवारी महाराष्ट्राच्‍या नगर जिल्‍हयातील कोपरगाव तालुक्‍यात पोहचली होती. अभियानाचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके, यात्रा के संयोजक मेजर जनरल एस. पी. सिन्हा, सह संयोजक कर्नल पी. एस. त्यागी, कर्नल यूबी ¨सह, हिंदुभूषण श्यामजी महाराज, दिल्‍ली नोएडा, समाजसेवक विजय यादव, संगठन के संयोजक विवेकानंद यांच्‍यांसह यात्रेतील सर्वांचे कोपरगाव येथे नगराध्यक्ष विजय वहाडणे, संघ परिवार, महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, महामंडलेश्वर शिवानंदगिरी महाराज, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी स्‍वागत केले.

या रथयात्रेचे स्‍वागत पुणतांबा फाटा येथे करण्यात आले. तेथून मोटारसायकल रॅलीने शहरात आगमन झाले. छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळयास अभिवादन करून रथयात्रा सभास्थानी आली. तिथे पाच सवासिनींनी त्‍यांचे औक्षण केले.

यावेळी शिवानंदगिरी महाराज, मेजर जनरल एस. पी. सिन्हा यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन चेतन खुबाणी यांनी केले. सुभाष दवंगे यांनी प्रास्‍ताविक केले. मुकूंद काळकुंद्री यांच्या वंदेमातरम्‌ या राष्ट्र्गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. अंबोरे यांनी आभार मानले.