Breaking News

श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी साबळे तर उपाध्यक्षपदी वाघ

श्रीरामपूर (वार्ताहर) - श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी रोहित साबळे यांची तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत वाघ यांची निवड करण्यात आली. असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मावळते अध्यक्ष विशाल अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. असोसिएशनचे मावळते अध्यक्ष विशाल अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रोहित साबळे सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर चंद्रकांत वाघ (चितळी) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी अतिष देसर्डा, संघटकपदी अमितराज आहेर, जनसंपर्कपदी भानुदास बेरड, प्रसिद्धी प्रमुख म्हणून अनिल रणपिसे, तर कार्यकारिणीत माजी अध्यक्ष तिलक डुंगरवाल, विशाल अंभोरे, सचिन गायकवाड, ओम परदेशी, काका गुलाटी, अनिल उंडे, सुरेश पवार यांची निवड करण्यात आली आहे.़ यावेळी अनिल पांडे, विजय गुळस्कर, प्रविण रांका, महावीर रांका, अशोकराज आहेर, संतोष चोरडिया आदि ज्येष्ठ छायाचित्रकार उपस्थित होते.
यावेळी मावळते अध्यक्ष विशाल अंभोरे म्हणाले की, असोसिएशच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील छायाचित्रकार एकत्रित आणण्याचा आपण प्रयत्न केला. त्यास चांगले यशही मिळाले. वृक्षारोपन, सर्व छायाचित्रकाराचा विमा पॉलिसी, ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सत्कार, 10 वी व 12 वी तील गुणवंतांचा सत्कार तसेच फोटोग्राफी विषयावर श्रीपाद दगडे याचे व्याख्यान आयोजित केले होते. पुढेही असेच उपक्रम राबविले जातील, असेही ते म्हणाले. ़़़