Breaking News

देशातील सामाजिक परिस्थिती धोकादायक...

देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती धोकादायक बनत चालली असून, त्याची वेळीच नोंद घेण्यासाठी विरोधकांकडून ज्याप्रमाणे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे, त्याचप्रमाणे भाजपाच्या खासदारांनीच आता सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला आहे. उत्तरप्रदेश या राज्यातील सावित्रीबाई फुले (बहराईच), छोटेलाल खरवार (रॉबर्ट्सगंज) अशोक कुुमार दोहरे (इटावा) आणि यशवंत सिंग (नगिना) या चार खासदारांनी आपली नाराजी वा संताप लपवून न ठेवता जाहीरपणे व्यक्त केला आहे. त्यांनी दलितांच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. भारत बंदच्या दरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनानंतर देशातील विविध भागांमध्ये दलित समाजावर होणार्‍या अत्याचारात वाढ झाल्याचे वक्तव्य भाजप खासदार उदित राज यांनी केले आहे. यावरून स्पष्ट होत आहे, की भाजपमध्ये असलेले दलित, ओबीसी समाज नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे.  दोन एप्रिल रोजी झालेल्या आंदोलनात सहभागी होणा-या दलितांवर अत्याचाराच्या बातम्या येत आहेत, पण हे थांबायला हवं. दोन एप्रिलनंतर देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत. बाडमेर, जालोर, जयपूर, ग्वालियर, मेरठ, बुलंदशहर, करोली आणि अन्य ठिकाणी अशाप्रकारच्या घटना होत आहेत. केवळ आरक्षणविरोधी लोकंच नाही तर पोलीस देखील मारहाण करीत आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवलं जात आहे, असा आरोप राज यांनी केला.
हा प्रकार देशांतील अल्पसंख्याक समूदायासाठी धोकादायक आहे. देशांतील संपत्ती ही मूठभर लोकांच्या हातात एकवटली असून, त्यांना देशांच्या सर्वसमावेशक विकासाचे काही एक घेणे देणे नाही, असे असतांना, मोठया संख्येंने असलेल्या अल्पसंख्यांक, ओबीसी, दलित या समाजाचा विकास रखडवण्याचे, व कॉर्पोरेट जगतांला  पोसण्याचे, त्यांना कर्ज, जमीन, पाणी, वीज, स्वस्तात पुरवण्यासाठी सरकार व्यवस्था करते. ते गलेलठ्ठ नफा कमवून, सरकारची फसवणू करतांत, मात्र येथे राष्ट्रीय  हित, समानता या बाबी दिसून येत नाही. देशभरात अशी अनेक घरांणी पोसण्यांची कामे वर्षानुवर्ष सुरू आहे. मात्र तोंड दाबून मुक्यांचा मार सहन करणार्‍या वर्गांच्या हितासाठी जेव्हा काही करण्यांची वेळ येते, तेव्हा त्यांना आश्‍वासंन अथवा, छोटासा तुकडा टाकून त्यांची भलावण करण्यात येते. हा वर्ग स्वाभिमानी आहे, मात्र आर्थिक उदरनिर्वाहासाठी कोणतीच साधने नसल्यामुळे हा वर्ग तुटका-मोडका रोजगार आणि कल्याणकारी योजनांवर अवलंबून आहे. मात्र या योजनांना कात्री लावत हा निधी उद्योगधंद्याकडे वळवण्यात येत आहे. ज्यातून मल्ल्यांसारखे कर्जबुडवे येणार्‍यार काळात पुन्हा जन्माला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला तर दुसरीकडे भाजपच्या आमदार, खासदार, मंत्र्यांकडून बेताल वक्तव्यांची परिसीमा गाठली. या सर्व बाबी जनता उघडया  डोळयांने बघत आहे. देशात सरकार नावाची वस्तू अस्त्विात आहे का? असा सवाल करू लागली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकींत भाजपकडून अच्छे दिनांच्या स्वप्नांची पेरणी केली, मात्र आता पीक कुठे आहे? असा सवाल जनता करू लागली आहे. मात्र स्वप्नांची पेरणी करून झाल्यावर जर पीक दाखवता येत नसेल, किंवा  आमच्या कर्माने आम्ही पीक आणू शकलो नाही, याची कबूली देण्याची कुवत जर तुमच्यात नसेल, तर जनता सवाल करणारच. विकासकामांची पेरणी कराल, तर जनता  तुम्हाला जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मात्र फक्त स्वप्नांची पेरणी करून, जर जनतेच्या भावभावनांशी खेळाल तर, सुज्ञ जनता लोकशाही मार्गाने तुमचे  तख्त उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही, असाच काहीसा संदेश भाजपा खासदार तर देऊ इच्छित नसणार.
------------------------------