Breaking News

अग्रलेख - नक्षली चळवळीला हादरा !

नक्षलवाद्यांची चळवळ आता नवीन राहीलेली नाही. मात्र ही चळवळ आता म्हातारी झाली आहे. आजच्या तांत्रिक युगात ही चळवळ काहीसी खंगलेली जाणवत असून, त्यामुळेच या चळवळींचा शेवट होतांना दिसून येत आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधात गडचिरोली पोलिसांनी ऐतिहासीक कामगिरी बजावत अवघ्या 36 तासात 27 नक्षल्यांचा खात्मा केला आहे. माओवाद्यांच्या विरोधातील गेल्या क ाही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. या दैदिप्यमान कामगिरीबद्दल पोलिसांचे देशभर क ौतुक होत आहे. मात्र एकीकडे नक्षलवाद चळवळ मोडीत काढण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करत असतांना, यश मोठया प्रमाणात मिळत आहे. मात्र नक्षलवादी चळवळीचे पायेमुळे खोलवर रूजले असून, सहजासहजी या चळवळींचा शेवट करणे शक्य नाही. नक्षवाद्यांवर मोठी कारवाई झाल्यामुळे, बचावलेले नक्षलवादी नक्कीच दबा धरून संधीची वाट बघू शकतात, अशावेळी पोलीसांनी नक्षलवादी चळवळीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची खरी गरज आहे. नक्षलवादी चळवळीला मिळणारी आर्थिक रसद ही त्यांची मोठी ताकद आहे. आर्थिक रसद तोडल्याशिवाय ही चळवळ मोडीत काढणे शक्य होणार नाही. देशात नक्षलवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे, त्यांना दोन हात करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा नवे डावपेच आखत आहेत. राज्यात मात्र नक्षलवादासारखी समस्या मुळापासून नष्ट क रण्यासाठी अगदी स्थानिक पातळीपासून काम करण्याची गरज आहे. नक्षलवादाला नेहमीच चळवळीचे स्वरूप देण्यात आले आहे. त्यातून किशोरवयीन मुलांना या चळवळीकडे ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरसारख्या दुर्गम परिसरात विद्यार्थ्यांवर नेहमीच ही विचारसरणी बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आपोआपच या मुलांचा नक्षलवादाकडे कल वाढतो. ज्या वयात राज्यातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीअर, सनदी अधिकारी होण्याची स्वप्न उराशी बाळगत असतात. ते ध्येय साध्य करण्यासाठी धडपड करत असतात. देशात नक्षलवाद्यांच्या क ारवायांमध्ये वाढ झाली आहे, त्यांना दोन हात करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा नवे डावपेच आखत आहेत. राज्यात मात्र नक्षलवादासारखी समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी अगदी स्थानिक पातळीवर काम सुरू आहे. गडचिरोली व गोंदियासारख्या नक्षलग्रस्त परिसरातील किशोरवयीन मुलांसाठी राज्यातील इतर भागांचे दौरे आयोजित करण्यात आले असून, त्यातून या विद्यार्थ्यांना समृद्ध राज्याचे दर्शन घडवण्यात येत आहे. काही प्रमाणात बदल घडतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे नक्षलवादी आपल्या तंत्रज्ञानात बदल करत, अद्यावत होण्यासाठी धडपड करतांना दिसून येत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शासनाकडून सुधारणा करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे, तसाच नक्षलवादी स्वत: ला अद्यावत करत हल्ले करत, सर्वसामान्यांना वेठीस धरत आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या क ारवाईला विशेष महत्व प्राप्त होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बोरिया जंगलात पोलिसांचे सी-60 पथक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाची बटालियन -9 यांच्या संयुक्त कारवाईत 16 नक्षली ठार झाले होते. तर मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झालेल्या नक्षलवाद्यांनी घटनास्थळाहून पळ काढला होता. त्यापैकी 15 नक्षलवाद्यांचे मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आलेत. त्यामुळे रविवारी झालेल्या चकमकीतील मृतांचा आकडा 31 झाला आहे. तर अहेरी येथील राजाराम खांदला येथे सोमवारी 23 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. त्यामुळे अवघ्या 36 तासात एकूण 37 नक्षवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तरीदेखील इतर राज्यातून महाराष्ट्रात नक्षलवादी दाखल होऊ शकतात. कारण महाराष्ट्रातील नक्षलवादी चळवळ कोलमोडून पडली, तर आपल्या साथीला मदतीसाठी इतर राज्यातील नक्षलवादी धावून येतात. त्यामुळे राज्याराज्यातील नक्षलवादी चळवळ मोडीत काढण्यासाठी आक्रमक पावले उचलावी लागणार आहे.