’नेओनॅटल रेस्पिरेटर’ मशीनची ससूनला देणगी
पुणे, दि. 30, एप्रिल - जन्मतः श्वसनदोष असलेल्या नवजात अर्भकांना श्वसन सपोर्टसाठी उपयुक्त ठरणारे ’नेओनॅटल रेस्पिरेटर’ची देणगी पालकमंत्री गिरीश बापट यांनी ससून रुग्णालयाला एका क ार्यक्रमात दिली आहे.
डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, नेओनॅटल रेस्पिरेटर हे मशीन नवजात अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. ससून रुग्णालयात 2017 मध्ये 20 हजार 976 बाल रुग्णांनी ससून बाह्यरुग्ण विभागाचा लाभ घेतला आहे. ससून सर्वोपचार रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. ससूनची वर्षाला 7 लाख बाह्यरुग्ण तर 70 हजार आंतररुग्ण सल्ला व उपचारासाठी येतात. ससूनला 80 जी प्रमाणपत्र लाभले आहे. ससून अत्याधुनिकिरण करण्यासाठी सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.