Breaking News

कच-याची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी


पुणे, दि. 30, एप्रिल - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा जकात नाक्यासमोरील माळरानावर टाकून तो जाळला जात आहे. त्यातून निघणा-या धुरामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी गावठाण, रुपीनगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर व प्राधिकरण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कच- याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी निगडी येथील डॉ. बाबासाहेब. आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे केली आहे.

या संदर्भात कदम यांनी कॅन्टोन्मेंट बोर्मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ’बोर्डाच्या हद्दीत दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. हा कचरा बोर्डाच्या जकात नाक्यासमोरील माळरानावर आणून टाकला जातो. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. विल्हेवाटीसाठी कच-याला आग लावली जाते. आग लावल्याने जळणा-या कच-यापासून मोठ्या प्रमाणात धूर निघतो. हा धूर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील यमुनानगर आणि प्राधिकरण भागापर्यंत पोचत आहे.