नांदगावात भिमभक्तांची महामानव डॉ. आंबेडकर यांना मानवंदना मिरवणुक आणि ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांचे आयोजन
कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे पंचशील तरुण मंडळाकडून आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात पार पडली. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड व नशीर सय्यद यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी भीम भक्तांनी भिमवंदना सादर केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत शेकडो महिला, मुले तसेच आबाल वृद्धांनी एकत्र येऊन मिरवणुकीचा आनंद घेतला. गावातील सर्व भागात फडकविण्यात आलेल्या झेंड्यांनी गावातील वातावरण भिममय बनले होते. तालुक्याच्या विविध भागातील भिमभक्त कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मिरवणुकीच्या सांगतेनंतर किरण जावळे प्रस्तुत पंचशीला ओर्केस्ट्रा मुंबईकर यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये हिंदी मराठी भीम गीतांनी लोकांची मने जिंकली. मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड, उपाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, अनिल गायकवाड, सुरेश गायकवाड, रावसाहेब गायकवाड, कृष्णा झेंडे, राजेंद्र गायकवाड, दिपक गायकवाड, दादा गायकवाड, दशरथ गायकवाड, अविनाश गायकवाड, दत्ता भालेराव, काका गायकवाड, गणेश गायकवाड, कांतीलाल गायकवाड, नितीन गायकवाड, दीपक कांबळे, लालासाहेब गायकवाड, राहुल गायकवाड आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.