Breaking News

सरकारी हरभरा खरेदी केंद्राचे पालकमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन


शहरामध्ये केंद्र सरकारच्या आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन जलसंधारण तथा पालकमंत्री ना. राम शिंदे यांच्या हस्ते झाले. शेतकर्‍यांच्या हितासाठी नवीन तहसील कार्यालयासमोर जुन्या शासकीय गोडाऊनमध्ये हरभरा शासनाच्या हमी भावाने खरेदी करण्याचे तात्काळ काम सुरू झाले. 
यावेळी या आधारभुत खरेदी केंद्रांचे संचालक भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, जि.प. सदस्य सोमनाथ पाचरने, तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, युवा मोर्चाचे प्रविण सानप, सभापती सुभाष अव्हाड, उप-सभापती राजश्री मोरे, पं. स. सदस्य तथा माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, पं. स. सदस्या मनिषा सुरवसे, नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नगरसेवक अमित चिंतामणी, गणेश आजबे, निखिल घायतडक, बाजार समितीचे सभापती, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार विजय भंडारी, प्रवीण चोरडीया, डॉ. कैलास हजारे, सोनेगावचे सरपंच चत्रभुज बोलभट, जायभायवाडीचे सरपंच एकनाथ जायभाय, नान्नजचे सरपंच संतोष पवार, सरपंच, ग्रामसेवक, नागरिक व शेतकरी उपस्थित होते.