Breaking News

गुन्हा रद्द करण्यासाठी सेनेची औरंगाबाद खंडपीठात याचिका



केडगावमधील दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकीसंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा या मागणीची याचिका शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. सदर बाब न्यायप्रविष्ठ असल्याने अटक न करण्यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना आदेश द्यावेत अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस महासंचालक सतीश माथूर यांना शिवसेनेने पाठविले आहे.