Breaking News

दत्तू गीतेंचा भ्रष्टाचार लोकार्पण सोहळ्यात प्रतिष्ठेच्या मांडीवर

अनेक कामांच्या भ्रष्टाचाराचे ओझे खांद्यावर असूनही बांधकामाचे मुल्यांकन न करताच ठेकेदाराला देयके अदा करण्याचा दत्तू गीते भिवंडीच्या प्रतिष्ठेच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करीत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेळूमाता व्यायामशाळेच्या उदघाटन सोहळ्याच्या निमित्ताने भिवंडी तालुक्यातील वळ मुक्कामी भिवंडीच्या राजकारणात आपआपल्या क्षेञात प्रतिष्ठा प्राप्त केलेले दिग्गज उपस्थित राहत असून याच व्यासपीठावर भिवंडी पंचायत समितीत तब्बल सोळा वर्ष शाखा अभियंता आणि गेल्या तीन वर्षापासून उपअभियंता पदाचा प्रभारी पदभार सांभाळणारे दत्तु गीते हे प्र तिष्ठीतांच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्याने हा सभारंभ वादग्रस्त ठरू पहात आहे.दत्तु गीते यांची एकूण कारकिर्द लक्षात घेता या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकारण्यांची प्रतिष्ठेला भ्रष्टाचारी गीतेंचा संसार्ग होणार की ही प्रतिष्ठा गीतेंच्या भ्रष्टाचाराला पावन करून घेणार अशी चर्चा सुरू आहे.


भिवंडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात सोळा वर्ष शाखा अभियंता म्हणून कार्यरत असताना उपविभागाचा प्रभारी पदभार स्वतःकडे ठेवण्याचा आटापिटा करून दत्तु गीते यांनी शासन प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून कोट्यावधीचा भ्रष्टाचार गेल्याचा आरोप आहे.
मु.वळ पोस्ट राहनाळ येथील ग्रामनिधीतीतून बांधकाम झालेल्या शेळूमाता व्यायाम मंदिराच्या उदघाटन सोहळ्याला रविवार दि.29 एप्रील 2018 रोजी सकाळी दहा वाजता भिवंडीचे खासदार कपील पाटील,भिवंडी ग्रामिण मतदार संघाचे आ.शांताराम मोरे,भिवंडी पश्‍चिमचे आ.महेश चौगूले,भिवंडी पुर्वचे आ.रूपेश म्हाञे ,ठाणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती सुरेश म्हाञे,जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील,कुंदन पाटील,पं.स.सदस्या सौ.रविना जाधव,विकास भोईटे,भानुदास पाटील आदींसह तालुका आणि ग्राम पातळीवर विविध क्षेञात कार्यरत असलेले प्रतिष्ठीत मान्यवर ग्रामस्थांच्या आग्रहास्तव उपस्थित राहणार आहे.या गावाची आर्थिक सुबत्ता लक्षात घेता शासनाच्या मेहेरबानीवर अवलंबून न राहता ग्रामपालिकेच्या उत्पन्न स्रोतावर गावाचा विकास घडविण्याची क्षमता ग्रामपालिकेत आहे.याच ग्राम निधीतून शेळूमाता व्यायामशाळेचे बांधकाम पुर्ण झाले असून या प्रतिष्ठीतांच्या साक्षीने या व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे.ग्रामस्थांनी या सोहळ्याला भिवंडी पंचायत स मितीचे भ्रष्टाचाराचे विक्रमवीर शाखा अभियंता दत्तु गीते यांनाही निमंञीत केले आहे.दत्तु गीते यांच्या नावावर या आधी अनेक भ्रष्ट विक्रम नोंदवले गेले असतांना लोकार्पण होत असलेल्या व्यायामशाळेच्या संदर्भातही एक विक्रम नोंदविला गेला आहे.
या व्यायाम शाळेच्या बांधकामासाठी ग्रामनिधी वापरला गेला असला तरी या कामाचे मुल्यांकन केल्या शिवाय ठेकेदाराला कामाचे देयके अदा करता येत नाही.मुल्यांकन करून देयके अदा करण्याची जबाबदारी उपअभियंता यांची असते.या जबाबदारीलाही दत्तु गीते यांनी कोलून लावत ठेकेदाराला देयके अदा केली आहेत.देयके अदा करून हे प्रकरण थांबत नाही तर ज्या बांधकामाचे मुल्यांकन झाले नाही त्या कामाचे देयके अदा कशी झाली आणि लोकार्पण सोहळा कसा होतो? असा दुहेरी प्रश्‍न निर्माण झालेल्या या सोहळ्यात तालुकाची प्रतिष्ठा खर्या अर्थाने भ्रष्ट अभियंत्यांच्या मांडीला मांंडी लावून बसणार असल्याने प्रतिष्ठा भ्रष्टाचाराला जाब विचारणार की भ्रष्टाचार प्रतिष्ठेला कलंक लावणार हा खरा कळीचा मुद्दा बनला आहे.