Breaking News

सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मोहटादेवी ट्रस्टतर्फे पाच लाखांची देणगी

पाथर्डी तालुक्यातील जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे यांच्यावतीने अहमदनगर धर्मादाय उपायुक्त कार्यालयात होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी पाच लाखांचा धनादेश अधीक्षक उत्तम गावडे यांच्याकडे विश्वस्त भास्करराव सांगळे यांनी सुपुर्द केला. यावेळी धर्मादाय उपायुक्त हिराताई शेळके, सहायक धर्मादाय आयुक्त बी.टी.येंगडे व व्ही.बी.धाडगेसह सामुदायिक विवाह समितीचे सदस्य उपस्थित होते.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्यावतीने दि.१मे रोजी येथील ओम गार्डन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यातील अनेक संस्थांनी मदत केली असून, यामध्ये श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे एक लाख, अवतार मेहेरबाबा ट्रस्ट एक लाख, क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान ५१ हजार, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज एक लाख, देवगड देवस्थान ५१ हजार, माळीवाडा गणपती देवस्थान ५१ हजार आदी संस्थांनी देणगी दिली आहे. तर एक देणगीदार सर्व वधूंना मणी मंगळसूत्र देणार आहे. पवार कुटूंबियांनी ओम गार्डन विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे.