Breaking News

ठाणे जिल्हापरिषदेत दत्तु गितेच्या कर्तृत्वाचे गुलछर्ये

दत्तु गीते...एक शाखा अभियंता तब्बल सोळा वर्ष एकाच ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे गुलछर्ये उधळत आहे. भिवंडी उपविभागात शाखा अभियंता असलेल्या या दत्तुकडे तीन वर्षापासून चक्क उपअ भियंता पदाचा पदभार आहे. महाराष्ट्रात शेती दुष्काळाच्या सावटाखाली आहे असे ऐकले होते, पण बांधकाम विभागातही उपअभियंत्यांचा दुष्काळ पडला आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि ठाणे जिल्हा परिषद प्रशासन दत्तु गितेवर एव्हढे मेहेरबान झाले का?

तीन वर्षात एकही लायक उपअभियंता मिळाला नाही म्हणून दत्तु गितेला भिवंडी उपविभाग आंदण दिला का?
सोळा वर्ष एकाच ठिकाणी सेवा देणारा दत्तु गिते आहे तरी कोण? सोळा वर्षात एकदाही बदलीच्या प्रक्रियेतून दत्तु गिते कसा सुटला? कोण आहेत दत्तु गितेचे पाठीराखे? कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अ धिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनीही दत्तु गितेच्या प्रभावासमोर नांगी का टाकली? विद्यमान मुख्य क ार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांचे खास दूत म्हणून ठाणे जिल्हा परिषदेत रूजू झाले असतांनाही विवेक भिमनवार दत्तु गितेला शरण का जातात?
नेमकी कुठल्या षडयंत्राची करणी केली दत्तु गितेंने? जिप प्रशासनाचे कुठले इंगीत आहे दत्तु गितेक डे? जिल्हा महसुल प्रशासनाचेही प्रपंच चालविण्याची ताकद असलेला या दत्तु गितेची कुंडली सादर करणारी लेखमाला...