खंडोबा यात्रोत्सवानिमित्त खेडला विविध कार्यक्रमांचे आयोजन
कर्जत तालुक्यातील खेड येथे खंडोबा यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सुरु होणारे कार्यक्रम सलग तीन दिवस चालणार आहेत. यात्रोत्सवानिमित्त खंडोबा मंदीर परिसराचे सुशोभीकरण व रंगरंगोटी करण्यात आली आहे.
सोमवारी यात्रोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. रात्री 10 वाजता जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 1 मे रोजी रात्री नऊ वाजता मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बुधवारी सकाळी हजर्यांचा कार्यक्रम होत असुन सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा हगामा होणार आहे. राज्याच्या विविध भागातील मल्ल येथे कुस्ती आखाड्यात उतरणार आहेत. रात्री नऊ वाजता सुभाष यादव प्रस्तुत कॉमेडी तडका तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे.