दुष्काळाशी दोन हात भारतीय जैन संघटनेची साथ
तालुक्यात गोंदरडी, डिकसळ, राक्षसवाडी बु, टाकळी खंडश्वरी आणि कुंभेफळ या पाच गावात मशीनचा शुभारंभ करण्यात आला, तर लवकरच मुळेवाडी, करमनवाडी, आळसुंदे, बारडगाव सु. कौडाणे आदीसह इतर श्रमदान करणार्या गावाातही मशीन दिले जाणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अभय बोरा यांनी दिली.
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मूथ्था यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला असून पानी फाउंडेशन आयोजीत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मधील सहभागी गावांना भारतीय जैन संघटनेतर्फे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी जेसीबी-पोकलेन मशीन दिले जात आहेत. याअंतर्गत टाकळी खंडेश्वरी येथे सुरू करण्यात आलेल्या पोकलेनचे उद्घाटन डॉ. राजेंद्र खेत्रे व आशिष बोरा यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी किरण पाटील, सुधीर फरतडे, उपसरपंच सागर ढोबे, चेअरमन अंकुश देवकर, दत्तात्रय डुबल, गुरुचरित्र डुबल, विश्वनाथ तांबे, दादा ढोबे, राहुल सकट, गोपीनाथ ढोबे, नागेश शेळके, अनिल शेळके यांसह शरद थोरात हे उपस्थित होते.
कुंभेफळ येथे जेसीबी मशीनचे उद्घाटन भारतीय जैन संघटनेचे युवा कार्यकर्ते यश बोरा व अनिकेत खाटेर यांचेसह ग्रामस्थ महिला व जेष्ठ नागरिक यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अभय बोरा, सरपंच काकासाहेब धांडे, उपसरपंच पप्पू धोदाड, सचिन उकीरडे, योगेश धोदाड, दत्ता धोदाड, श्रीकांत धोदाड, तुषार पांडुळे, रावसाहेब पाटील, काकासाहेब वाळूंजकर, सौरभ पांडुळे, राजाबाई सकट, चंद्रप्रभा पांडुळे, मालन धोदाड, कांताबाई धोदाड, बबिता धोदाड, विमल धोदाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी काकासाहेब धांडे यांनी भारतीय जैन संघटना करत असलेल्या कार्याचे कौतुक करताना शांतिलाल मूथ्था यांनी दुष्काळाशी दोन हात करण्याचे स्वप्न पाहिले, यासाठी महाराष्ट्रात चळवळ उभी केल्यामुळे त्यांचे नाव मानाने घेतले जाईल असे सांगत आम्ही स्पर्धेत यश मिळवू असा विश्वास व्यक्त केला. कुंभेफळ गावात चांगले काम सुरू असल्याचे कौतुक केले. तर उपसरपंच पप्पु धोदाड यांनी गावासमोर असलेली मशिनरीची मोठी समस्या जैन संघटनेने दूर केल्याचे सांगत आभार मानले.