Breaking News

थायलंडमधील आंतरराष्ट्रीय आरोग्य संमेलनात डॉ. निर्मळ यांचा सहभाग

अहमदनगर / प्रतिनिधी । 11 ः आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विविध वनस्पतींवर व आजारांवर अधिकाधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे लक्षात घेवून अमृतवेल आयुर्वेदिक उद्यानाची स्थापना केल्याचे प्रतिपादन डॉ. शारदा निर्मळ-महांडूळे यांनी केले. 
थायलंडची राजधानी बँकॉक शहरात मिनिस्ट्री ऑफ हेल्थ मार्फत आयोजित आणि सिरिवधना भाकडी फाऊंडेशनमार्फत आंतरराष्ट्रीय आरोग्य संमेलनात त्या बोलत होत्या. ही परिषद बँकॉकमधील वाटा-फो या रिक्लाईन बुद्धाच्या भव्य मंदिर परिसरात आयोजित केली होती. यामध्ये चीन, इंग्लंड, वेस्ट इंडिज, थायलंड, सिंगापूर अशा अनेक देशातील डॉक्टर, संशोधक आणि औषध कंपन्या सहभागी झाल्या होत्या. डॉ. महांडूळे यांनी स्वतः निर्माण केलेल्या गार्भिणी प्राशबद्दल यावेळी माहिती दिली. भारतात निर्माण झालेल्या आयुर्वेदाचे आरोग्य चांगले राखण्यासाठीचे महत्व डॉ. महांडूळे यांनी सांगितले. आयुर्वेद हे परिपूर्ण शास्त्र आहे. सर्व आजार आयुर्वेद उपचारांनी बरे होतातच परंतू आजार होऊ नये आणि आपले स्वास्थ कसे टिकवून ठेवता येईल हे सांगणारे एकमेव आयुर्वेदशास्त्र आहे, असेही त्यांनी सांगितले.