Breaking News

मिरजगावात पुन्हा कांदा खरेदी केंद्र सुरू जणावरांचा बाजारही पुर्ववत भरणार

मिरजगाव / वार्ताहर । 11 ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरजगाव येथे पुन्हा एकदा कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. मिरजगाव येथे यापूर्वी कांदा खरेदी केंद्र सुरु होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथील कांदा खरेदी व जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता. त्यामुळे बाजार समितीचे मोठे नुकसान होत होते. त्याबरोबरच या परिसरातील शेतकर्‍यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. बाजारसमितीला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळाने येथील कांदा खरेदी केंद्र व जनावरांचा बाजार सुरु करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.  बाजार समितीचे सभापती श्रीधर पवार यांच्या हस्ते येथील कांड खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यावेळी उपसभापती प्रकाश शिंदे, संपत बावडकर, राजू भंडारी, मिरजगावचे उपसरपंच अमृत लिंगडे, शहाजी राजेभोसले, कैलास बोराडे, लहू वतारे, माजी सरपंच सारंग घोडेस्वार, संजय शेलार, विजय पवार, बाजार समितीचे अधिकारी श्याम काळोखे, विकास तनपुरे, अजिनाथ म्हेत्रे व  कांदा उत्पादक शेतकरी उपस्थिती होते. यावेळी मिरजगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. मिरजगावमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरु होताच परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर आपला कांदा आणला होता. यावेळी कांदा लिलाव सुरु करण्यात आल्याने व येथे चांगला भाव मिळत असल्याने या भागातील शेतकर्‍यांचा वाहतूक खर्चही कमी झाला आहे. लवकरच येथील कांदा मार्केट नावारूपाला येईल असा विश्‍वास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. तसेच मिरजगांवचा बंद झालेला जनावरांचा बाजार सुरू झाल्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना आपली जनावरे आता येथेच खरेदी विक्री करणे सुलभ होणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.