Breaking News

विद्यार्थ्यांनी वाचविले कबुतराचे प्राण पक्ष्यांना उष्णतेचा तडाखा सोसेना

पारनेर / प्रतिनिधी । 11 ः येथील जिजामाता विद्यालयाच्या मैदानावर एक जखमी अवस्थेत असलेले कबुतर विद्यालयातील अरूण पठारे, संजय शिंदे, सोपान गवते, बाबाजी चौधरी, या युवकांना आढळला त्यांनी त्या कबूतरास पाणी पाजले. त्यास उडता येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने कुत्र्यांपासून त्यास त्रास होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर व तसेच त्याला प्राथमिक उपचाराची गरज असल्याने अरुण पठारे व संजय शिंदे यांनी कबुतराला पारनेर येथील तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयात नेले, तिथे वैद्यकिय अधिकारी हर्षला ठुबे यांनी त्याच्यावर उपचार केले. त्यांना मदतनिस म्हणून अमृता वास्ते यांनी मदत केली. वातावरणात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाल्याने कबुतराला अशक्तपणा आल्यााचे डॉक्टर ठुबे यांनी सांगितले. उपचारानंतर कबुतराला वनअधिकारी पल्लवी जगताप यांच्या स्वाधीन करण्यात आले. दोन दिवसांनंतर त्याला उडता आल्यानंतर जंगलात  सोडून देण्यात येईल असे जगताप यांनी सांगितले.
दरम्यान पारनेर येथेच हॉटेल चित्रासमोर एका हरणास अज्ञात वाहनाने उडवल्याने हरणाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हरणास वनाधिकारी पल्लवी जगताप यांनी रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करून त्यानंतर त्याच्यावर जंगलामध्ये नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.