Breaking News

उषा जाधवकडूनही कास्टिंग काऊचचा गौप्यस्फोट


हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी एका मुलाखतीदरम्यान कास्टिंग काऊचचे समर्थन करत जाहीर विधान केल्यानंतर आता या चित्रपटसृष्टीतील आणखी काही कलाकार कास्टिंग काऊचवर भाष्य करू लागले आहेत. मराठी अभिनेत्री उषा जाधव हिने बॉलीवूडमध्ये कास्टिंग काऊच सामान्य असल्याचे विधान करतानाच तिचा याबाबतचा अनुभवही कथन केला. मला एका निर्मात्याने सेक्सची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट तिने या वेळी केला.