Breaking News

इम्‍तीयाज शेख आणि नदिम शेख या दोन्‍हीही मल्‍लांना प्रवरा उद्योग समुहाचे सहकार्य

पाथरे बुद्रूक येथे महालक्ष्‍मी यात्रा उत्‍सावानिमित्‍त उत्‍सवानिमित्‍त आयोजित करण्‍यात येणा-या कुस्‍त्‍यांच्‍या हगामाची परंपरा कायम राखली जात असल्‍याचा अभिमान आहे. या परिसरातील इम्‍तीयाज शेख आणि नदिम शेख या दोन्‍हीही मल्‍लांना प्रवरा उद्योग समुहाचे सहकार्य देवून, महाराष्‍ट्र व हिंद केसरीसाठी प्रोत्‍साहन दिले जाईल असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

महालक्ष्‍मी यात्रेनिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या कुस्‍तीस्‍पर्धेचा शुभारंभ विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आला. माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, भाऊसाहेब घोलप, नंदु राठी,भाऊसाहेब कडू, शांतीनाथ आहेर, आबासाहेब घोलप, उमेश घोलप, मुनिर शेख, मुन्‍नाभाई शेख, प्रवीण घोलप आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात ना.विखे पाटील म्‍हणाले की, कै.बाबुराव घोलप यांच्‍या स्‍मृती जागृत ठेवून कुस्‍त्‍यांच्‍या स्‍पर्धा या यात्रा उत्‍सवा‍ निमित्‍ताने भरविल्‍या जात आहेत. यातून कुस्‍तीपटुनां प्रेरणा मिळत आहे. आपल्‍या परिसरातील या कुस्‍ती स्‍पर्धांना चांगला दर्जा प्राप्‍त व्‍हावा यासाठी सहकार्य करु अशी ग्‍वाही देतानाच ना.विखे पाटील म्‍हणाले की, इम्‍तीयाज शेख आणि नदीम शेख या दोन्‍हीही कुस्‍तीपटुंचे भवितव्‍य उज्‍वल आहे. महाराष्‍ट्र आणि हिंद केसरीमध्‍ये जाण्‍याची संधी त्‍यांना मिळावी यासाठी आपल्‍या सदिच्‍छा कायम आहेत. प्रवरा उद्योग समुहातर्फे या दोन्‍हीही कुस्‍तीपटुना सर्वोतोपरी सहकार्य करण्‍याचे आश्‍वासन दिले.