Breaking News

कर्म करत राहिल्यास यश निश्‍चित - गहिनीनाथ महाराज आढाव

भातकुडगाव (प्रतिनिधी )- जिथे भगवंताची निष्काम भक्ती आहे तिथे काळाची सत्ता चालत नाही, कर्म हे माणसाच्या हातात आहे, चांगले वाईट याचा फरक कळतो म्हणून कर्म हे समजून घ्या, कर्म त्यागून जीवनामध्ये कोणालाही यशस्वी होता येत नाही असे प्रतिपादन सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचे चौथे पुष्प गुंफताना भागवताचार्य गहिनीनाथ महाराज आढाव यांनी केले.

शेवगाव नेवासा राजमार्गावरील भायगाव या ठिकाणी नवनाथ बाबाच्या भव्य प्रांगणात श्री क्षेत्र देवगड संस्थान चे मठाधिपती महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने चालू असलेल्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहात आढाव महाराज बोलत होते, कोणत्याही क्षेत्रात किंवा समाजातील विविध घटकामध्ये कार्य करताना मी पणा चालत नाही कर्माचा सिद्धांत समोर ठेवावा लागतो. निस्वार्थी भावना तयार करावी लागते तेंव्हाच केलेल्या कर्माची फलप्राप्ती होते. कर्माविषयी चिंतन मांडताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यातील उदाहरण देऊन श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले. पारंपरिक धर्म ग्रंथातील अनेक दाखले देऊन कर्म श्रेष्ठ असल्याचे उपस्थितांसमोर विचार मांडले , हा उत्सव आता महोत्सव होत आहे तो एकट्याचा नाही तो सर्वांचा आहे , अशी भावनिक साद महाराजांनी घातली यामध्ये योगदान देणार्‍या प्रत्येक घटकांचं कौतुक केले पाहिजे असे मत त्यांनी मांडले. समाजातील वाईट विचाराच्या लोकांकडे लक्ष न देता आपण कार्य करत राहिल्यास कार्य श्रेष्ठ ठरवून भगवंत प्राप्तीचा मार्ग सुखकर होतो असे ठाम मत त्यांनी मांडले मायभूमी मध्ये कीर्तन करताना मोठेपणा पेक्षा मोठमोठी माणसे समोर आहेत हाच खरा मोठेपणा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कीर्तन हे तरुण पिढीला सक्षम असे प्रबोधनाचे माध्यम व्हावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी दत्तात्रय महाराज कुलट, सुभाष महाराज मोरे, हरिभाऊ महाराज अकोलकर, अविनाश महाराज लोखंडे, प्रतिभा महाराज शेळके, माजी चेअरमन जनार्धन लांडे , शेषराव दुकळे, सदाशिव शेकडे, बाळासाहेब दुकळे, लक्ष्मण लांडे , राजेंद्र आढाव, माणिक शेकडे , अनंता देशपांडे, संजय लांडे , हरीचंद आढाव, जगन्नाथ आगळे, नानासाहेब दुकळे जगन्नाथ आढाव, हरीचंद घाडगे , मुरलीधर दुकळे , सखाराम शेकडे , नाना लोंढे , जनार्धन लोढे , दत्तात्रय धावणे, दगडू दुकळे , धोंडीराम ढोरकुले विठ्ठल आढाव, जालिंदर नेव्हल , कडूबाळ दुकळे, बाबासाहेब शेळके, लक्ष्मण पवार, मुरलीधर आढाव , पांडुरंग आढाव, मुरलीधर कोलते आण्णासाहेब दुकळे, विष्णू घाडगे , रघुनाथ आढाव , गंगाराम नेव्हल, पांडुरंग लटपटे ,रमेश आढाव , शहाराम आगळे, निवृत्ती आढाव , सूर्यभान विखे ,गौरव थिटे , राजेंद्र दुकळे ,आबा कातकडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या .