Breaking News

डॉ.टी.एम.वराट यांची जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सल्लागारपदी निवड


अहमदनगर येथील मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी.एम.वराट यांची अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सल्लागार मंडळाच्या बैठकीत सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचे पत्र डॉ.वराट यांना देण्यात आले आहे.जनता शिक्षण प्रसारकमंडळाच्या अहमदनगर येथील महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राचार्य डॉ. टी.एम.वराट हे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात मागील 38 वर्षे सेवेत होते. या कालावधीत त्यांनी भूगोल विभागप्रमुख, विद्यापीठ अभ्यास मंडळ सदस्य , उपप्राचार्य,एम फिल.व पीएच.डी. मार्गदर्शक तसेच नॅक समन्वयक अशा विविध पदांवर प्रभावीपणे काम केले आहे.त्यांचे महाविद्यालयीन कामात प्रदीर्घ व प्रभावी कार्य व योगदानाची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष श्रीनंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सेक्रेटरी जि. डी. खानदेशे, सह सेक्रेटरी विश्‍वासराव आठरे खजिनदार डॉ. विवेक भापकर यांच्याशिष्टमंडळाने ही नियुक्ती केली आहे.या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र घुले, सभापती डॉ क्षितीज घुले, प्रशासकीय अधिकारी डॉ.के के पवार, दहिगाव ने घुले महाविद्यालयाच ेप्राचार्य डॉ. डि एन वाबळे, जनता महाविद्यालयाचे प्राचार्य जि.एम.साठे आदींसह प्राध्यापक व महाविद्यालयीन कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.