Breaking News

गणेश इंटरनॅशनल स्कुल विद्यार्थ्यांचे माहेरघर : शेटे


राहाता प्रतिनिधी - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या प्रकारे शिक्षण देणारी संस्था असावी, म्हणून को­हाळे येथे नर्सरी ते १२ वी पर्यंतचे उच्च दर्जाचे शिक्षण देणारी ही संस्था स्थापन केली. तालुक्यातील को­हाळे येथील ही संस्था विद्यार्थ्यांचे माहेरघर आहे, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्राध्यापक विजय शेटे यांनी केले. 

ते म्हणाले, की विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांकडून कमी खर्चामध्ये शिक्षण मिळावे, यासाठी या संस्थेत तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. येथे ८ वी पासूनच विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांसाठी विद्यार्थ्यांचा सराव आणि परिक्षेद्वारे अभ्यास पूर्ण करुन घेतला जातो. विद्यालयाचा दरवर्षीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त असतो. प्रत्येक वर्षी शेकडो विद्यार्थ्यांची निवड अभियांत्रिकी प्रवेशसाठी होते. विद्यार्थ्यांना डिजिटल क्लास पध्दतीद्वारे शिक्षण दिले जाते. ११ वी १२ वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी जी, निट, सी. बी. एस. सी. क्रॅश कोर्स त्याचबरोबर विविध प्रकारच्या कोर्सेसच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेतली जाते. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृह आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सामान्य कुटूंबातील असतात. शहरात जाऊन महागडे शिक्षण घेणे बहुतांशी विद्यार्थ्यांना शक्य नसते. म्हणून विद्यार्थ्यांना याची उणीव भासू नये, यासाठी म्हणून अत्यंत कमी खर्चात चांगल्या दर्जाचे शिक्षण येथे उपलब्ध करून दिले आहे. पालकांच्या विश्वासाला पात्र राहत मुलांच्या निकालाची योग्य यशोगाथा कायम रहावी, म्हणून येथील सर्व शिक्षक प्रयत्नात असतात.