Breaking News

राज्यस्तरिय धनुर्विद्या स्पर्धेत नगर जिल्ह्याला तिन पदके


नेवासा फाटा : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना कोल्हापूर, जिल्हा धनुर्विद्या संघटना व आदर्श विद्यानिकेतन मिणचे, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 16 व्या राज्स्तरीय वरीष्ठ गट धनुर्विद्या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याने 1 सुवर्ण , 1 रजत व 1 कांस्य अशी तिन पदके पटकावले. आज झालेल्या खेळात रीकर्व्ह राऊंण्ड प्रकारात लक्ष्मी नरेंद्र दारवंटे हीने वैयक्तिक सुवर्ण व सांघीक रजत पदक पटकावण्यात मोलाचे योगदान दिले.

रीकर्व्ह राऊंण्ड संघ पुढील प्रमाणे लक्ष्मी नरेंद्र दारवंटे , समृद्धी चंद्रकांत वामन, प्रिया गायकवाड व शितल चन्ने .तसेच इंडियन राऊंण्ड प्रकारात जागृती सुधिर कुंदे हिने ओव्हरऑल रजत व 50 मीटर अंतरावर कांस्य पदकावर नेम साधला व राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान पटकावले. वरील सर्व खेळाडु नेवासाफाटा येथील स्वराज्य क्रीडा अकॅडमी मध्ये निवासी राहुन धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. सर्वांना जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा व प्रशिक्षीका डॉ. शुभांगी रोकडे दळवी सचिव व मुख्य प्रशिक्षक अभिजीत दळवी यांचे प्रशिक्षण लाभत आहे . वरील सर्व खेळाडुंना जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश शेटे, सुनिल चावरे , शिव सेना उप जिल्हा प्रमुख रामदास गोल्हार , रामदास शिंदे , हीराचंद तनपुरे , रविंद्र तनपुरे सुधिर बोरकर, सोनी साहेब, डॉ.लंघे , खुळे तसेच स्वराज्य क्रिडा अकॅडमीच्या अध्यक्षा सरोज दळवी , भिमाबाई चावरे, विकास चावरे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.