Breaking News

श्रीरामपुर शहर विविध पुतळ्यांच्या प्रतिक्षेत


श्रीरामपूर शहरामध्ये मागिल अनेक वर्षांपासून रेल्वेस्टेशन जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा , शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्‍वारुढ पुतळा, रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवण्याची मागणी होत असताना विविध कारणांमुळे पुतळे आत्तापर्यंत बसवण्यात आलेले नाहीत. डॉ.आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी प्रत्येकी 15 लाख, संत लूक हॉस्पिटल जवळ मदर तेरेसा यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी 5 लाखाची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

पुतळे तयार असल्याचेही वेळोवेळी सांगण्यात आले आहे. सर्व सोपस्कार होऊनही पुतळे बसविले जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकभावना व चबुतरे पुतळ्यांच्या प्रतीक्षेत असून लवकरात लवकर पुतळे बसविण्याची मागणी होत आहे. 14 एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. 14 एप्रिल पूर्वी डॉ.अांबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा रेल्वेस्थानकाशेजारी लुम्बिनी बुद्ध विहार समोर सध्या अस्तित्वात असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचा जागेवर होईल अशी अशा होती. पूर्णाकृती पुतळ्यासाठी अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, उपोषणे झाली. पालिकेच्या सभेतही यावर अनेक वेळा वादळी चर्चा झाली. या पुतळ्याचे भूमिपूजनही झाले होते. परंतु अनेक तांत्रिक कारणांमुळे आजपर्यंत पूर्णाकृती पुतळा होऊ शकला नाही. श्रीरामपूरमध्ये आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे डॉ. आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते. आंबेडकरप्रेमी डॉ. आंबेकडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमत असतात. तसेच शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्‍वारुढ पुतळा बसवण्याची मागणीही मागील अनेक वर्षांपासून होत आहे. शिवाजी महाराजांचा आश्‍वारुढ पुतळा शिवाजी चौकातच व्हावा यासाठी अनेक हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, नागरिक यांनी अनेकदा आंदोलने केली, उपोषणे केली, सह्यांची मोहीम राबवली. नगरपाकिकेच्या निवडणुकीतही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय महत्वाचा मुद्दा बनला होता. नगरपालिकेच्या सभेतही यावर अनेकदा वादळी चर्चा झाली. 

पुतळ्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. एवढंच नव्हे तर पुतळा तयार आहे असेही सांगण्यात येते. परंतु काही तांत्रिक अडचणीचे कारणे सांगून पुतळा बसविला जात नाही. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नगराध्यक्षा अनुराधा अधिक यांच्यसह अनेकांनी शिवाजी चौकात पुतळा बसविण्यासाठी जागेची पाहणी केली होती तेव्हा काही तांत्रिक कारणांमुळे पुतळा बाविण्यासाठी अडचण येतअसल्याचे सांगण्यात आले. 

शहरात पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवण्यासाठीही अनेक वेळा आंदोलने झाली, चर्चा झाली, निवेदने दिली गेली परंतु आजतागायत त्यांचाही पुतळा बसविण्यात आलेला नाही. धनगर समाज संघर्ष समितीने अनेक वेळा अहिल्याबाईंच्या पुतळ्यासाठी आंदोलने केली. निवेदने दिली. पुतळा बसविण्यात येईल असे अनेक वेळा आश्‍वासन दिले ; परंतु अजूनपर्यंत त्याचा पुतळा बसविण्यात आला नाही. रेल्वेस्थानकाच्या स्थानकाच्या उत्तर भागात महात्मा जोतिबा फुले व अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असून तिथेच अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासाठी चबुतराही तयार करून ठेवण्यात आला आहे आहे. परंतु अजूनही तिथे अहिल्याबाई होळकरांचा पुतळा बसविण्यात आलेला नाही. येथील पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासाठी तयार करून ठेवलेला चबुतरा, कॉलेज रोडला जर्मन हॉस्पिटल जवळ असलेला मदर तेरेसा यांचे संगमरवरी फरशीवर चित्रकृती बनवण्यात आली आहे तेथे मदर तेरेसा यांच्यासाठी तयार केलेला चबुतरा पुतळ्यांच्या प्रतीक्षेत आहे. तसेच शिवाजी चौकात शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा व रेल्वे स्थानकालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागेवर पूर्णकृती पुतळा होण्याची वाट शिवप्रेमी व आंबेडकरप्रेमी पाहत आहेत. 

रेल्वेस्थानकाशेजारी लुम्बिनी बुद्ध विहार समोर डॉ. आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा असून तिथे पूर्णाकृती, शिवाजी चौकात छत्रपतींचा अश्‍वारूढ पुतळा, तसेच रेल्वे स्थानकाच्या उत्तर भागात फुले व साठेंच्या पुतळ्यालगत पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यासाठी चबुतरा तयार असून तेथे अहिल्याबाईंचा बसविण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून असून अजूनही पुतळे बसविले नसल्याने जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.