Breaking News

घाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण


औरंगाबाद : औरंगाबाद येथिल घाटी रूग्णालयात डॉक्टरला रूग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीला दोन वाजण्याच्या सुमारास ही घडना घडली आहे. घटनेनंतर घाटी रूग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रूग्णाजवळ अधिक लोकांनी थांबू नये. असे सांगितल्याने डॉक्टर आणि रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला. याच वादातून रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याचे समजले आहे. निवासी डॉक्टर डॉ. हर्षद चव्हाण यांना रूग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. तसचे एका सहयोगी प्राध्यापकालाही धक्काबुकी करण्यात आली. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.