Breaking News

एमआयएमचा स्वतंत्र गट कायदेशीरच उच्च न्यायालयाचा निर्णय ; घोषित गटनेते शेख अमर यांना दणका

बीड ,(प्रतिनिधी) नगर पालिका उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी एमआयएमच्या सात नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला होता. जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिलेला स्वतंत्र गट बेकायदेशीर असून गट नोंदवण्याचा व गटनेता निवडून देण्याचा अधिकार त्या सात नगरसेवकांना नाही , म्हणून शेख अमर जैनोद्दीन यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर एमआयएमचा स्वतंत्र गट कायदेशीर असून गटनेता हा घोषित नव्हे तर निवडणूक नियुक्त असावा असा निर्णय काल न्यायालयाने दिला आहे. स्वतंत्र गटाच्या वतीने ऍड. सय्यद तौसिफ यांनी बाजू मांडली. 
बीड नगर पालिकेत उपाध्यक्ष निवडीच्या वेळी एमआयएमच्या सात नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला होता. शेख सुलताना बेगम शेख चाँद यांना गटनेता म्हणून निवडल्याचा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंद करण्यासाठी दिला होता. दि. 28 डिसेंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र गटास मान्यता दिली. सदर निर्णयाविरोधात शेख अमर जैनोद्दीन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. एमआयएम पक्षाने गटनेता म्हणून आपल्याला घोषित केले असून सात नगरसेवकांना स्वतंत्र गट नोंदविण्याचा आणि गट नेता निवडून देण्याचा अधिकार नसल्याचे याचिकेत नमूद केले होते. सदर याचिकेवर दि.10 जानेवारी 2017 रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीत स्वतंत्र गटाच्या गटनेत्या शेख सुलताना बेगम यांच्यावतीने एड.सय्यद तौसिफ यासिन यांनी बाजू मांडली. मागील आठवड्यात यावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. काल ( गरुवारी ) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी एमआयएमचा स्वतंत्र गट कायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे. गटनेता हा घोषित नव्हे तर सदस्य नियुक्त असतो असे मतही न्यायालयाने नोंदविले आहे. यावेळी स्वतंत्र गटाच्या वतीने ऍड. सय्यद तौसिफ यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. दरम्यान आजचा निर्णयामुळे याचिकाकर्ते शेख अमर यांना मोठा दणका बसला असून गेल्या दीड वर्षांपासून ते पक्ष घोषित गटनेते म्हणून कार्यरत आहेत.