Breaking News

पाणी आणि शिक्षण हीच खरी संपत्ती - काशिनाथ नवले


भेंडा (प्रतिनिधी ) - पाणी आणि शिक्षण हीच खरी संपत्ती असून पाण्यामुळे जीवन तर शिक्षणामुळे जगणे समृद्ध होते असे प्रतिपादन ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले यांनी केले. नेवासे तालुक्यातील भेंडा खुर्द येथील अल्फा इंग्लिश मेडीयम स्कुलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी अल्फा स्कुलचे संस्थापक अमरावतीचे अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, पंचगंगा सिड्सचे कार्यकारी संचालक प्रभाकर शिंदे, श्रीगोंदयाचे उपविभागीय अधिकारी गोविंदा दाणेज, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, सरपंच सुनील खरात, अशोक मिसाळ, सुखदेव फुलारी, बाळासाहेब नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सरोदे, रमेश पाडळे, राधाकिसन भागवत आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रामकृष्ण नवले, भाऊसाहेब सावंत, कारभारी गरड, वामन मापारे, पावलस गोर्डे, विलास खरात, यडूभाऊ सोनवणे, प्रवीण खरात,भाऊसाहेब खरात,निलेश खरात,दिपक भागवत,अड सुनील शिंदे,प्रा.माणिक खरात,पास्टर विजय गोरे, चंद्रभागा खरात, रिपीका खरात, प्राचार्या,शिक्षक व पालक आदी उपस्थित होते.