शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या
मयत धोंडीराम भानुदास शिरसाट (वय 42 वर्षे ) या तरुणाने काल सकाळी 6 वाजण्याच्या पुर्वी अशोक रामा गाडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली केली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे कर्ज काढून ऊसतोडणीसाठी गेली होती. परंतु जमीन दीड एकर असल्याने ते बँकेचे कर्ज भरु शकले नाहीत. त्यामुळे कर्ज बाजारीपणाला कंटाळून आपले जिवन गळफास घेऊन आत्महत्या करून जिवन संपवले आहे. त्यांच्या पाठीमागे दोन मुले व पत्नी असून, एक मुलगा हा जामखेड येथील आयटि आयचे शिक्षण घेत आहे. दुसरा मुलगा हा शाळा शिकत असून. या मुलांचे शिक्षणाचा खर्च आणि बँकेचे कर्जबाजारी असल्याने अवघ्या दीड एकर जमीनीमध्ये हा सर्व खर्च निघत नाही, त्यामुळे ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. या सर्व कर्ज बाजारीपणाला कंटाळून अखेर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तरीही शासनाने या मुलांच्या शिक्षणासाठी व शासकीय सेेवेत त्यांच्या मुलाला घेऊन आत्महत्या ग्रस्त कुंटूबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मयत कै धोंडीराम भानुदास शिरसाट यांच्या कुटुंबियांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच कुसडगावचे सरपंच दादासाहेब हवाशेठ सरनोबत व माजी पंचायत समितीचे सदस्य शरद कार्ले, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष व नागेश विद्यालयातचे शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश आजबे यांनी तात्काळ सरदवाडी येथे जाऊन कै. धोंडीराम भानुदास शिरसाट यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पोलीस स्टेशनला माहिती गाडे लखूळ यांनी दिली असून, जामखेड पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढिल तपास जामखेड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ.शबाना शेख हे करत आहेत