Breaking News

जांभूळवाडी शाळेत प्रेरणा सभागृहाचा लोकार्पण सोहळा

पारनेर तालुक्यातील सुपा येथिल जांभूळवाडी जिल्हा परिषद शाळेतील 2 वर्गखोल्या व 5 लाख लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या प्रेरणा सभागृहाचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्या राणी लंके, पारनेर पंचायत समितीचे सभापती राहूल झावरे, उपसभापती दिपक पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहूल शिंदे, सुप्याचे सरपंच भाऊसाहेब पवार, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, वाघुंड्याचे सरपंच संदिप मगर, ग्रामपंचायत सदस्या शोभा पवार, उज्वला शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी लोकसहभाग देणार्‍या 34 जनांना शाळेतर्फे ट्रॉफी देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलेल्या जांभूळवाडी शाळेत अनेक उपक्रम चालू असल्याने पट झपाटयाने वाढला आहे. लेझीम पथक, झांजपथक, सेमी इंग्लिश, स्पोर्ट ड्रेस, कराटे प्रशिक्षण, गॅदरिंग, शैक्षणिक सहली, सुसज्ज हॉल, बालआनंद मेळावे आदींमुळे ही शाळा जिल्ह्यातील शाळांसाठी एक आदर्श ठरली आहे.
पालकांनी लाखो रुपये लोकवर्गणीतून सुसज्ज हॉल, गार्डन, पाण्याची टाकी, लेझीम, ढोल, ताशा, झांज, साऊंड सिस्टीम, फॅन, हायमॅक्स, बोअरवेल, पंप इत्यादी शाळेत बसवले आहेत.