Breaking News

आठ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

संगमनेर/प्रतिनिधी। तालुक्यातील आंबीदुमाला येथे अवघ्या ८ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी महादू कृष्णा ढेरंगे या ५४ वर्षांच्या आरोपीला अटक करण्यात आली.

आरोपी ढेरंगेने पंधरा-वीस दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून सायंकाळी एका शेतातील गिन्नी गवताच्या आडोशाला नेऊन, अश्लिल कृत्य केले. याबाबत मुलीने रविवारी (दि. १) रोजी आपल्या आईला घरी सांगितले. तिच्या आईने घारगाव पोलिस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी ढेरंगेला अटक केली. दरम्यान, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अन्सार इनामदार करीत आहेत.