प्रलंबीत अनुदान तत्काळ दया ः चिखली काँग्रेसची मागणी
बुलडाणा, दि. 08 - शेतकर्यांचे ठिबक संच, तुषार संच व ट्रॅक्टरचे प्रलंबीत अनुदान त्वरीत देण्यात यावे अशी मागणी चिखली तालुका कॉगे्रस कमिटीच्या वतीने एका निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी यांना करण्यात आली.
चिखली तालुक्यातील ठिबक संच, तुषार संच व टॅक्टरचे गेल्या 3-4 वर्षापासूनचे अनुदान शेतकर्यांना मिळालेले नाही. यापूर्वी वारंवार निवेदने देवूनही यावर कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद शासनाकडून मिळालेला नाही. प्रलंबीत अनुदानाचे वाटप झाले नाही तर तालुका कॉगे्रसच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी तालुका कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भ्ाुसारी, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, युकाचे रमेश सुरडकर, कृउबास संचालक विजु पाटील, ज्ञानेश्वर सुरूशे, ईश्वरराव इंगळे, नगरसेवक दिपक खरात, राजु रज्जाक, डॉ. मोहमंद इसरार, सुनिलकुमार सुरडकर, तुषार भावसार, अमिनखॉ उस्मानखॉ, बबनराव पानझाडे, राजेंद्र सुरडकर, भिकनराव ठेंग, आदी उपस्थित होते.
शेकडो शेतकर्यांचे ठिबक व तुषार संचाचे 2013-14, 2014-15 व 2015-16 चे अनुदान शासनाकडे थकीत आहे. शेतकर्यांनी नगदी किंवा बँकेच्या कर्जाच्या सहायाने अनुदान मिळेल या आशेवर खरेदी केली. मात्र शासनाने अजुनही अनुदान दिले नाही, वारंवार शेतकरी या संदर्भात कार्यालयाकडे चकरा मारतात व त्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात, ट्रॅक्टरच्या अनुदानाचे बाबतीतही असाच प्रकार घडत आहे. सदर अनुदान लवकर न मिळाल्यास त्रस्त शेतकरी व कॉगे्रस कार्यकर्ते तिव्र आंदोलन छेडतील असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.