प्रो कबड्डी लीग : चौथ्या मोसमाची सुरुवात मुंबईतून होणार
मुंबई, दि. 19 - मुंबईतील कबड्डी चाहत्यांसाठी खुशखबर आहे. प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या मोसमाची सुरुवात पुण्याऐवजी मुंबईमधून होणार असल्याचं आयोजकांनी जाहीर केलं आहे.
पुण्यातील बालेवाडीमधील शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे पुणेरी पलटनच्या होम ग्राऊंडवर 25 जूनला प्रो कबड्डीच्या चौथ्या मोसमाची सुरूवात होणार होती. पण त्याच दिवशी बालेवाडीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे 25 ते 28 जूनदरम्यान होणारे सामने पुण्याऐवजी आता मुंबईच्या वरळीतील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या इनडोर स्टेडियममध्ये खेळवले जातील.