Breaking News

कर्जतसाठी नगरविकास विभागाकडून 10 कोटींचा निधी मंजूर : नगराध्यक्ष राऊत


कर्जत नगर पंचायतीस नगरविकास विभागाकडून 10 कोटी रूपये निधी वैशिष्टपुर्ण कामासाठी विशेष निधी मंजुर झाला असल्याचे नगराध्यक्ष नामदेव राऊत व उपनागराध्यक्ष बापुसाहेब नेटके यांनी सांगीतले.

या निधीतून कर्जत नगर पंचायत प्रशासकीय इमारत व शॉपींग कॉम्प्लॅक्ससाठी सात कोटी, चौक सुशोभिकरण करण्यासाठी 2 कोटी, प्रभाग क्र. 5 मधील विजय तोरडमल शोरूम ते म्हेञे निवासस्थानापर्यत रस्ता काँक्रिटीकरण, बर्गेवाडी पुलापासून ते चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे यासाठी 19 लाख 43 हजार रूपये तसेच करमाळा रोड ते ठुंबे सर याच्या निवासस्थानपर्यत काँक्रिट रस्ता करणे व गदादे नगर अंतर्गत रस्ता करणे 15 लााख 25 हजार रूपये ढोर गल्ली ते मोहोळवाडा रस्ता करणे, भणगे गल्ली ते कोरेगाव वेसीपर्यत काँक्रिट रस्ता करणे, 12 लाख 60 हजार रूपये ढेरेमळा ते विनोद गुंड निवासस्थाना पर्यत काँक्रिट रस्ता, नलवडेवस्ती ते मांडगेमळा डांबरीकरण रस्ता करणे 15 लाख,90 हजार रूपये मांडगेवस्ती ते सांडवा खडीकरण रस्ता करणे, जामा मस्जीद ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेट रस्ता काँक्रिटकरण करणे, गायकरवाडी तलाव ते बरबडेवस्ती रस्ता खडीकरण करणे, राजेंद्र बारटक्के ते गुजर घरापर्यंत काँक्रिटकरण रस्ता करणे, लोहार गल्ली काँक्रिटकरण रस्ता करणे 10 लाख 70 हजार रूपये, राशीन रोड पासून ते आक्काबाई मंदीराकडील बाजुकडील रस्ता पेव्हरब्लॉक बसविणे, आतारवाडा येथे काँक्रिट रस्ता करणे 11 लाख 40 हजार रूपये नगरविकास विभागाकडुन विषेश निधी मंजूर झाल्याने कर्जतचा चेहरामोहरा बदला जाणार असुन कर्जत आता गाव नाही तर शहर होणार आहे.


ना. राम शिंदे व नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी निवडणुकीत कर्जतचा चेहरा मोहरा बदलणार व कर्जत शहर बदलणार असा शब्द देवून मते मागीतले होते. त्यावर विश्‍वास ठेवून लोकांनी मते दिली होती. व प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान नामदेव राऊत यांना मिळाला. या संधीचे सोने नामदेव राऊत यांनी करून दाखविलेले आहे. 
ना. राम शिंदे व नगराध्यक्ष नामदेव राऊत याच्या सततच्या पाठपुरव्याला यश मिळाले. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस यांनी कर्जतच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा समारोप प्रसंगी रामभाऊ असा राम शिंदे याचा उल्लेख करत वैयक्तीक लक्ष असल्याची जाणीव करून देत विकासासाठी तुमच्याही पुढे आहे. हे हा विशेष निधी देवून दाखवून दिले. कर्जतला विशेष निधी मिळावा म्हणून राम शिंदे व नगाराध्यक्ष नामदेव राऊत सतत पाठपुरावा करत होते.