पाथर्डी येथे आंबेेडकर जयंती उत्साहात
पाथर्डी (प्रतिनिधी) - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर शुक्रवारी रात्री श्री तिलोक जैन प्रसारक विद्यालय येथे भीम गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. प्रांत अधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी सकाळी पुष्पहार घालून अभिवादन केले तर शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या आमदार मोनिका राजळे याही या कार्यक्रमसाठी उपस्थित होत्या. तर माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे यांनीही या जयंतीसाठी उपस्थिती दर्शवली. सकाळी अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे यांनी म्हटले की, बाबासाहेबांनी राज्यघटेनेतून शांततेचा, समानतेचा, संदेश जगाला आणि भारत देशाला दिला, त्यांच्या राज्यघटनेचे पाईक म्हणून सर्वजण काम करतात, त्यांनी दिलेल्या शिका आणि संघटित व्हा या संदेशामुळे आज प्रत्येक समाज संघटित होऊन शिक्षण उपलब्ध झाल्याने आज शिक्षण घेऊन अगदी उच्च पदावर काम करतायेत यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यानंतर दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर रात्री घेण्यात आलेल्या भिमगित कार्यक्रमात बिपीन खंडागळे, संजय राजगुरू, शाहीर भारत गाडेकर , सचिन साळवे , अल्ताफ शेख यांनी आपली कला सादर करून नागरिकांचे मने जिकून आनंददायी वातावरण निर्माण केले होते. यावेळी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे, रवींद्र वायकर, देविदास खेडकर, नगरसेवक नामदेव लबडे, अनिल बोरुडे, प्रसाद आव्हाड,प्रवीण राजगुरू ,रमेश गोरे, मंगलताई कोकाटे, डॉ मृत्यूजय गर्जे, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, सुनिल परदेशी, सुनिल ओहळ, रमेश हंडाळ, सुभाष केकाण, डॉ टकले, सुभाष घोरपडे, भैय्या थोरात आदी उपस्थित होते . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पप्पू बोर्डे, दिगंबर गाडे, किशोर राजगुरू, रविंद्र आरोळे, महेंद्र राजगुरू, बाबा राजगुरू, बथुवेल पगारे , नाना पगारे, वाल्मिक मामा, ससे यांनी विशेष परिश्रम घेतले