वाळुच्या डंपरखाली चिरडुन मुत्यु प्रकरणी वाळु ठेकेदारासह तिघांविरूध्द गुन्हा दाखल
श्रीरामपुर ता. प्रतिनिधी - श्रीरामपुर तालुक्यातील गोवर्धन येथील गोदावरी नदी पाञातील दोन दिवसापुर्वी या गोदावरी नदी पाञात एका व्यक्तीचा डंपरखाली चिरडुन मुत्यु झाल्या प्रकरणी सिन्नर येथिल ठेकेदार सह तिघांविरूध्द श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोवर्धन येथील ,गोदावरी नदीपाञातील गुरूवारी पहाटे च्या दरम्यान एका वाळुच्या डंपरवर किनर म्हणून काम करणारा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथिल विलास मंगेश पिंपळे हा नदीपाञातील वाळुत झोपलेला असताना वाळुने भरलेल्या एम एच 15सीके 4115 यावर असलेल्या चालकाकडुन विलास च्या अंगावरून डंपर गेल्याने तो चाकाखाली चिरडुन जागीच ठार झाला घटनेनंतर पोलिस पथकाने, पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनकरून विलासचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी काल कामगार हाँस्पिटल च्या वैद्यकिय अधिकार्यांनी दिलेल्या अहवालावरून आक स्मात मुत्यु ची नोंद करुन डंपर पोलिस ठाण्यात आणुन जप्त केला. डंपरवरिल चालक घटना घडल्यानंतर पसार झाला पोलिस निरिक्षक वंसत पथवे यांनी या घटनेचा तपास वेगाने फिरवला त्या नुसार पोलिस नाईक शैलेन्द्र बाळासाहेब सगळगिळे यांनी फिर्याद दिली असुन पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथिल वाळु ठेकेदार राजेश गोपाळकृष्ण कपुर , संदिप मधुकर गायकवाड तसेच डंपर चालक या तिंघाविरूद्ध भाद वि कलम 304 ,379,431,188,34,पर्यावरण कायदा कलम 3,15अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल ही घटना घडल्या नंतर तहसिलदार सुभाष दळवी पोलिस निरिक्षक पथवे यांनी फौज फाट्या सहगोदावरी नदीपाञात घटनास्थळी भेट दिलीय. डि वाय एस पी वाकचौरे यांच्यासह विशेष तपास चौकशी, पथक व महसुलचे अधिकारी गोदावरी नदीपाञात,जाऊन वाळु चोरी व उपशाची व पिंपळे याला ट्रक खाली चिरडुन ठार मारून पसार झालेल्या आरोपी संबंधी माहीती घेणार असल्याचे सांगण्यात आले