Breaking News

संतांची दृष्टी परमार्थिक असते - गहिनीनाथ महाराज

शेवगाव (प्रतिनिधी ) - भगवंताच्या भक्ती मार्गात कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या प्रसार करणार्‍या व्यक्ती ह्या मानव कल्याणाचे हित आदर्श वादातून मांडतात परमार्थामध्ये चित्ताची गरज असते तर संसारात वित्ताची गरज असते व्यवहारात पित्ताला महत्व आहे. संत ज्ञानेश्‍वर माउलींची भाषा मृदू आहे तर संत तुकारामांची वचने ही कठोर आहे सर्वच संतांनी भगवंत प्राप्तीचा मार्ग सांगताना निस्वार्थ भक्तीला प्राधान्य दिले यातूनच संतांच्या परमार्थिक विचार पाहावयास मिळतो असे प्रतिपादन गहिनीनाथ महाराज आढाव यांनी केलेशेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे हनुमान मंदिरासमोर बापूसाहेब महाराज माटेगावकर यांच्या प्रेरणेने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात महाराज बोलत होते. यावेळी किशोर महाराज चव्हाण, नवनाथ महाराज म्हस्के, भरत महाराज चेडे, चैतन्य महाराज आढाव, कुंडलिकराव घोरतळे, विजूदादा घोरतळे, शिवाजी पठारे, दिलीप दिवटे, दत्तू शिंदे, संजय वाघमारे, प्रल्हाद शिंदे, पांडुरंग वाघमारे, मुकुंद घनवट, अनिल घोरतळे, भाऊसाहेब पोटभरे, सुरेश रुपणार ,अशोक विठ्ठल घोरतले, नंदाभाऊ शिंदे , शहाराम आगळे यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.