अवकाळी पावसात घरावर वीज पडून संसार खाक संसार रस्त्यावर; जिवीतहाणी टळली
राशीन व करपडी येथे काल झालेल्या वादळी वार्यासह झालेल्या पावसाने शेतकर्यांचे तर नुकसान झालेच त्याचबरोबर करपडी येथे पारधी समाजातील एका घरावर वीज पडल्याने या कुटूंबियाच्या संसाराचे होत्याचे नव्हते झाले. सुदैवाने यावेळी त्याठिकाणी कोणीही नसल्याने मनुष्यहानी झाली टळली.
काल 5 वाजता वादळी वार्याबरोबर विजेच्या कडकडाटासह पावसामध्ये करपडी येथील सुग्रिव विष्णू भोसले व प्रशांत सुग्रिव भोसले या पारधी समाजाच्या दोन कुटुंबियांच्या छपरावर विज पडून संसारोपयोगी वस्तू, कपडे, धान्य व सर्व कागदपत्रे, रेशन कार्ड, आधार कार्ड, जातीचे दाखले व जमीनीचे साठेखत आदी सर्व कागदपत्रे सर्व जळून खाक झाली. काल रात्री 6 वा.च्या सुमारास या दोन्ही कुटुंबातील सर्वच लोक राशीन येथील बाजारला गेले असताना अचानक आभाळ भरून आले व जोराचा वारा, विजांचा कडकडाटात पाऊस सुरू झाला, व अचानक वीज या दोन पालांवर पडली. पालाशेजारी राहत असलेले इब्राहीम पठाण व इतर लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग अटोक्यात न आल्याने सर्व जळून खाक झाले. या पालात सर्व सात व्यक्ती राहत होते, त्यांचे दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं बचावले. या कुटुंबियांना शासनाने मदत करावी अशी मागणी करपडीचे माजी सरपंच सुनील काळे यांनी केली आहे.