Breaking News

कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कुळधरण : प्रतिनिधी - कर्जत तालुक्यातील शिंदे गावच्या दत्तात्रय देवराव घालमे (वय 42) या शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. सेवा संस्थेसह खासगी कर्जाला कटांळून विष घेवून घालमे यांनी जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, मुलगी व पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.


सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घालमे यांनी विष प्राशन केले. जमीन कमी आहे, यामध्ये फार काही पिकत नाही. पिकलेच तर भाव मिळत नाही. सेवा सोसायटीचे 1 लाखापेक्षा जास्त तर खासगी सावकाराचे दीड लाख कर्ज आहे. शेती उत्पन्नामधून पोटही भरू शकत नसल्यामुळे कर्ज कसे फेडणार? असे त्यांनी विष पिल्यानंतर पुतण्याला सांगितले. त्यानंतर त्यांना तत्काळ नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी घालमे यांना मृत घोषित केले.