Breaking News

संघाच्या लोकांची न्यायव्यवस्थेत नेमणूक कपिल सिबल यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) लोकांना न्यायव्यवस्थेत नेमण्यासाठी न्यायव्यवस्थेवर हल्ला करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे नेते क पिल सिबल यांनी आरोप केला की, भाजपने या अगोदर देशातील शिक्षण संस्थांच्या महत्त्वाच्या पदांवर आरएसएसच्या प्रचारकांना नेमले आहे. आता ते आरएसएसच्या प्रचारकांना किंवा तशी विचारसरणी असणार्‍या लोकांना न्यायव्यवस्थेत नेमत आहेत. माजी कायदामंत्री सिबल पुढे म्हणाले की, आम्हाला हे मान्य नाही आणि आम्ही याचा विरोध करू. जर गरज पडली तर आम्ही हा मुद्दा न्यायसंस्थेत देखील मांडू. देशातील प्रत्येक संस्थेवर हल्ला होत असून माध्यमे आणि न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. या सरक ारला न्यायव्यवस्था नियंत्रणाबाहेर जात असल्याचे वाटत आहे, त्यामुळे ते न्यायव्यवस्थेला नियंत्रित करण्याचा विचार करत आहेत. जर तसे झाले तर लोकशाही कमकुवत होईल. हे सांगताना सिबल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ न्यायाधीश चेलमेश्‍वर यांच्या विधानाचीही आठवण करून दिली. न्यायमूर्ती चेलमेश्‍वर यांनी नुकतेच सरकार न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप क रत असल्याचे म्हणत हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. सरकार न्यायव्यवस्थेत त्यांच्या आवडीच्या व्यक्तींच्या निवडक पद्धतीने नेमणुका करत आहे आणि बाक ी लोकांना वेगळे पाडले जात आहे. त्यामुळेच न्यायव्यवस्थेत रिक्त जागांची संख्या एवढी मोठी असल्याचेही सिबल यांनी नमूद केले.