Breaking News

तामिळनाडूची केंद्राच्याविरोधात अवमान याचिका

नवी दिल्ली : कावेरी पाणी वाटपाचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. न्यायालयीन आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत तामिळनाडू सरकारने थेट केंद्र सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दिलेली मुदत उलटूनही सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळाची निर्मिती केली नसल्याचे या चिकेत म्हटले आहे. न्यायालयाने कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळाची निर्मिती 30 मार्चपर्यंत करण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेत ृत्वाखालील खंडपीठाने कावेरी पाणीवाटप प्रश्‍नावर निकाल दिला होता. कावेरी नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणार्‍या पाणीपुरवठ्यातही कपात केली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम केंद्र सरकारवर सोपविले होते.