नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे अखंड हरिनान सप्ताह उत्साहात संपन्न
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे अखंड हरिनान सप्ताह उत्साहात पार पडला . सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायन सोहळा महंत भास्करगिरी महाराज ,महंत सुनिलगिरी महाराज,गोपालगिरी महाराज , संतोष महाराज खाटिक यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा सप्ताह पार पडला. या सप्ताहात ज्ञानेश्वर ग्रंथाची सवादय मिरवणुक काढुन ,भजन ,पुजन ,आरती ,प्रवचन ,किर्तन,महाप्रसाद, अन्नदान ,केले जाते. तसेच मुक्तानंदगिरी महाराज वेल्हाळे संगमनेर यांच्या काल्याचे किर्तनाने सांगता करण्यात आली. तर या सप्ताहात चिलेखनवाडीचे संजय सावंत ,नाथा गुंजाळ ,प्रल्हाद कांबळे ,बाळासाहेब सावंत ,विलास सावंत ,नवनाथ सावंत ,भाऊसाहेब सावंत सर ,सुभाष सावंत ,सचिन वाघमोडे ,निवृत्ती वाघमोडे ,सुनिल गायकवाड ,चेअरमन भाऊसाहेब सावंत ,सरपंच ,उपसरपंच सर्व सदस्य मंडळ ,सोसायटी सर्व संचालक ,चिलेखनवाडी सर्व ग्रामस्थ ,व भजनी मंडळ,सप्ताहात विशेष परिश्रम घेतले