Breaking News

तरवडी ते नांदुरशिकारी रस्त्याच्या खडी व मुरमाचे नमुने दर्जा तपासणीसाठी प्रयोगशाळेत लोकमंथन इफेक्ट

भेंडा प्रतिनिधी - तरवडी ते नांदुरशिकारी रस्त्याच्या खडी व मुरमाचे नमुने दर्जा तपासणीसाठी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता आंधळे यांनी प्रयोगशाळेत नेण्यात आले आहेत. नेवासे तालुक्यातील तरवडी ते नांदुरशिकारी होत असलेल्या रस्त्याच्या कामाचे खराब मटेरिअल खडी व मुळापाटबंधारे चारी मायनर नंबर-4 मधील विनापरवाना ऊकरलेला मुरूम वापरून होत असलेले कमी दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात गाजत असताना आमदार बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पोटे, विनोदशींग परदेशी, मेजर एन. के. सिंग, ईश्‍वर गवळे ,अभीजीत पोटे, नेवासे तालुका अध्यक्ष ढोकने आदीनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कारवाईची मोहीम ऊघडली गेली. यासंदर्भात लोकमंथंनने रस्त्याच्या निकृष्ठ कामासंदर्भात प्रसिध्द के लेल्या वृत्तानुसार प्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करत रस्त्यात वापरलेला मुरूम अतिशय खराब आसलेला पाहून ठेकेदारास जागेवर बोलून घेत गांवांतील नागरिकांसमोर क ामाचा दर्जा सुधारण्यास सांगितले होते . परंतु ठेकेदारांनी त्यच्याकडे दुर्लक्ष करून कामाला सुरुवात केली होती यावेळी ठेकेदारांनामुरमाची ऊचल परवानगी पावती मागीतली असता त्यांनी मुळा -पाटबंधारे चारीतला मुरूम वापरलेला असल्याने पावती देऊ शकले नाही , खडीची पावती मगीतली असता त्यानी रोडच्या कामासाठी विहीरीचा बोगस दगड वापरलेला असुन तो ठेकेदार पावती देऊ शकला नाही, त्यावर ठेकेदाराला विचारले असता त्यांनी सांगितले की तालुक्यातील संपुर्ण दगड खानीचे कामे बंद असल्याने दगड व मुरूम मिळू शकत नाही . सदरच्या कामाची पाहणी जिल्हा परीषदेचे सी.ई.ओ. माने यांनी क रावी या करीता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष वीनोदसींग परदेशी, भिंगार शाखा अध्यक्ष एन.के.सिंग , ईश्‍वर गवळी, इंद्रपाल सिंह,रमाशंकर सिंह ,नितीन क दम, संदीप नवगीरे, संदीप भालेराव, अजयसिंह सोळंकी, डॉ. प्रमोद अळकुटे, शिवाजी गीते, कपीलेस्वर गायकवाड यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात सकाळी 10:00 पासून दुपारी 2:00 पर्यंत बैठा सत्याग्रह आंदोलन केल्यामुळे वरील कारवाई करने भाग पडले . सदरच्या बैठा सत्याग्रह आदोलनासाठी तरवडीचे गावचे 50 ते 60 गावकरी देखील उपस्थित होते. त्यामुळे अांदोलनाची तिव्रता वाढली गेली व आधिकार्‍यांना कारवाई करणे भाग पडले. मटेरीयलचे नमुने घेण्यासाठी अभियंता अांधळे आले असता माती परीक्षण अहवालात ठेकेदार दोषी आढळून आले तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल व परवाना नीलंबीत केला जाईल असे सांगितले.