कोपरगांव : तालुक्यातील कारवाडी येथील वीटभट्टीवर काम करणा-या मजुर जोडप्याच्या ७ वर्षांच्या मुलीवर शंकर पांडुरंग गायकवाड {रा. कारवाडी} या नराधमाने अत्याचार केला होता. याप्रकरणी कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे तपासाधिकारी सपोनि पी. वाय. कादरी यांनी जिल्हा व सत्र न्याय कोपरगांव यांच्यासमोर करुन दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने ६ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध परिस्थितीजन्य पुरावे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल ऍड. बाबासाहेब पानगव्हाणे यांनी काम पाहिले.