Breaking News

प्राथमिक शाळेस डिजीटल ग्लास बोर्ड प्रदान

श्रीरामपुर (प्रतिनिधी) : नविन तंत्रज्ञाच्या युगात बदल घडवुन आनायचा असेल तर क्षणिक प्रकल्पकरण्यापेक्षा दिर्घकाळ टिकणारे प्रकल्प करावे असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सुरज थोरात यानीं केले. रोटरी क्लब व रोटरी एज्यूकेशन ट्रस्ट श्रीरामपुर यांचे सौजन्याने ई.लर्निंग प्रोजेक्ट अंर्तगत श्रीरामपुर एज्यूकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेस मुख्याध्यापक एस. बी. गोरे यांना डिजीटल ग्लास बोर्ड प्रदान करण्यात आला व त्याचा प्रभाविपणे वापर कसा करावा याचे मार्गदर्शन नेवासा येथील मार्गदर्शक शिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केले. या डिजिटल ग्लास बोर्डसाठी जी विजेची आवश्यक्ता असते ती सोलर पॅनलच्या माध्यमाने सोडविण्याची जबबदारी रोटरी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष व संस्थेचे गव्हर्निग कौन्सीलचे सदस्य सुरेश बनकर यांनी घेतली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन राम टेकावडे होते. कार्यक्रमास कामगार नेते अविनाश आपटे, सचिव विनोद पाटणी , पंचायात समितीचे सदस्य डॉ.वंदना मुरकुटे, बाळासाहेब ओझा, सुनिल कुलकर्णी, जितेंद्र अग्रवाल , राजेद्र कांबळे, प्रकाश ढोकणे, प्रकाश चुग , नारायनभाई पटेल, प्रकाश पाटील निकम , ठकराल, छबुकाका गिरमे , गणेश देशपांडे , राजाभाऊ काळे , पुरुषोत्तम मुळे, डॉ.कवडे, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, वेताळ , देवेंद्र ढोकणे आदि सह शिक्षक एस.बी.नाईक , बी.आर.तोरकड, डी.आर.भोसले, डी.जे.सोनवणे, एन.आय.नागरे, एस. एस.महाशिकारे, व्ही.डी.रवीशंकर, व्ही.जी.डांगे, के.जे.वासकर, एस.पी.परदेशी, भालेराव, एस.व्ही.पुरानिक, ताके आदि उपस्थीत होते. यावेळी सुत्रसंचालन शिक्षिका मनिषा सोळुंके यांनी केले तर आभार बी.ई.भनगे यांनी मानले.