Breaking News

वाचकदूत मुलींचा अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानकडून सन्मान


पाथर्डी - शहरप्रतिनिधी - थोर स्वातं÷त्र्यसेनानी माजी आमदार स्व.बाबुजी आव्हाड यांच्या जयंतीचे औचित्य साधून मैत्रेयी ग्रुपकडून शहरात सुरु करण्यात आलेल्या मोबाईल वाचनालायाचे वाचकदूत म्हणून काम करणार्‍या 6 मुलींना अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानतर्फे सायकल वाटप करून सन्मानित करण्यात आले. मुर्‍हे श्‍वेता, शेटे पायल, जाधव सोनाली, राऊत उमा, काकडे पूजा, चव्हाण मयुरी या वाचकदूत मुलींनी मकरसंक्रांतीच्या दिवशी सुरु करण्यात आलेल्या मोबाईल वाचनालयाच्या माध्यामातून शहरातील साईनाथनगर, फुलेनगर, मेहेर टेकडी, इंदिरानगर, असरानगर भागात घरोघरी जाऊन वाचनचळवळ वृद्धिंगत होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. महिलांसाठी गृहशोभिका, आरोग्य तसेच पाककृतींची पुस्तके त्याचबरोबर लहान मुलांसाठी चरित्र, बोधकथा, चंपक अकबर बिरबल तसेच सामान्यज्ञान इ. पुस्तकांचे वाटप करून 10 दिवसानंतर ती पुन्हा बदलून देण्यात आली. अडीच महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक वाचकदूत सरासरी सत्तर घरांपर्यंत पोहोचून घरातील प्रत्येक सदस्याला पुस्तकांशी मैत्री करण्यास भाग पाडले. याप्रसंगी सन्मान कार्यक्रमात मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी येथून पुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा मानस असून उन्हाळ्याच्या सुट्टीत खास मुलांसाठी पुस्तक पेढी सुरु करण्यात येऊन मुलांना हवे ते पुस्तक वाचण्याची सुविधा या मोबाईल वाचनालायाअंतर्गत सुरु करण्यात येईल तसेच व्हाट्सएप, फेसबुक, इंटरनेट या समाज माध्यमापासून मुलांना अलिप्त ठेवण्यासाठी भविष्यात हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्‍वास व्यक्त केला. याप्रसंगी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, खजिनदार शिवाजीराव आठरे, सदस्य बाळासाहेब कचरे, शैलेंद्र कुलट, डॉ. बबन चौरे, नंदाताई पारगावकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, नगरसेवक प्रसाद आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, डॉ. शंकर चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी पाथर्डी तालुक्यातून खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेले अमोल देवढे व शहादेव डोळे तसेच डायट 
महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झालेल्या मुकुंद दहिफळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड तर आभार प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी मानले. स्व .बाबुजी आव्हाड यांच्या जयंतीनिमित्त आदर्श ब्लड बँक औरंगाबाद व अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. एन. सी. सी. छात्र, प्राध्यापक, तसेच शहरातील एकून 73 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी मोफत आरोग्यानिदान डॉ. महेश गर्जे यांनी केले. स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी गड किल्ले प्रदर्शन आयोजित केले.