Breaking News

मातोश्री अकॅडमी मध्ये कचराव्यवस्थापन दिंडी व जनजागृती मोहीम

शेवगाव ता. प्रतिनिधी - मातोश्री अकॅडमी सिबिएसी स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त कचराव्यवस्थापन दिंडी व जनजागृती मोहीम राबवणार असल्याची माहिती प्राचार्य दादासाहेब खेडकर यांनी दिली. ओला कचरा तसेच सुका कचरा हा संयुक्तरीत्या निसर्गनियमीत व मानवनिर्मित असतो याचे व्यवस्थापन करण्यासाठी ओला कचरा वेगळा व सुका कचरा वेगळा करावा तो कचरा वसाहतीत घराजवळ न टाकता व ओला अथवा सुका कचरा न जाळता त्याचे प्रदुषण न करता तो शासनाच्या पालीकेच्या घंटागाडीत टाकावा जेणेकरुन आपले घर गाव शहर स्वच्छ व सुंदर राहील.वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी असे उपक्रम राबवले असुन ते यशस्वीपणे पार पाडले आहे असाच आगळा वेगळा उपक्रम राबवुन शाळेत विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाचे महत्व पटवून देण्यासाठी व समाजात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम नक्की प्रेरणादायी ठरेल असे मत दादासाहेब खेडकर यांनी व्यक्त केले .या दिवशी शहरातुन शोभा याञा काढुन कचरा व्यवस्थापन टाळा व आरोग्य संतुलित ठेवा अशा प्रकारचे चलचिञ भीत्तीचिञ रेखाटण्यात येणार असुन वड, पिंपळ, बदाम, अशा प्रकारच्या वृक्षांच्या पानावर विद्यार्थी कचरा निर्मुलनपर संदेश लिहुन आनणार आहेत.अशी माहिती शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी दिली. तसेच अशा नाविन्यपूर्ण व समाजाभिमुख उपक्रमांची सुरुवात शाळेतून करुन विद्यार्थ्यांनी याची जनजागृती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यत करावी असे गौरवोद्गार संस्थाध्यक्ष किशोर दराडे यांनी काढले. या कार्यक्रमासाठी सिमा पठाण, कल्याणी सांगळे ,रिमा शेजवळ ,वैशाली टर्ल, अमित खरोटे , रविंद्र जायभावे, शाम रोकडे , राणी ठाकरे, ज्योती पाटील ,गणेश खांदवे ,तुकाराम गायकवाड आदी परिश्रम घेत आहेत तरी शहरातील सर्व शाळांनी यात सहभागी व्हावे असे आवहान मातोश्री अकॅडमी सिबिएसी स्कूलतर्फ करण्यात आले आहे.