तुकाईला चारीनेच पाणी मिळाले पाहिजे - सुर्यवंशी
कर्जत / प्रतिनिधी । - तुकाईला चारीने पाणी द्या, जाणूनबुजून उचल पाण्याचा अट्टाहास का केला जात आहे.तो मी कधीही सहन करणार नाही. तुकाईला चारीनेच पाणी मिळाले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुर्यवंशी यांनी केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन लिहुन त्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी उचल पाणी देण्याचा काढलेला तोडगा सूर्यवंशी यांना मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुर्यवंशी हे तुकाई चारीला पाणी देण्याची मागणी गेल्या 12 वर्षांपासुन करीत आहेत.कित्येक महिन्यांपासुन कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर त्यांचा बैठा सत्याग्रह सुरुच आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मुंबईत बैठक घेवून उचल पाणी देण्यावर संमती दर्शविली व त्यादृष्टीने कार्यवाही सुरु केली. मात्र हा तोडगा सुर्यवंशी यांना मान्य नसल्याने सत्ताधार्यांची कोंडी वाढली आहे.
आपण दोन वेळी दिलेला शब्द पाळला नाही. तुकाईला चारीने पाणी दिल्याने यावर वारंवार खर्च होणार नाही. उपसा सिंचनातुन शेतकरी व शासनाला दरवेळी खर्च येईल व त्यातुन तोटा होईल यासाठी चारीनेच पाणी देण्यात यावे अशी मागणी सुर्यवंशी यांनी निवेदनातुन केली आहे. निवेदनाच्या प्रती विविध शासकीय विभागांनाही देण्यात आल्या आहेत.