प्रा. अनिल शिंदे यांचा अपघाती मृत्यू
कोल्हार प्रतिनिधी : ऊसाने भरलेला ट्रक व मोटरसायकल यांची श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात धडक झाली. या अपघातात येथील शिक्षक प्रा. अनिल साहेबराव शिंदे {वय. ३४} यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी {दि. १५} रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
प्रा. शिंदे हे त्यांच्या मोटार सायकलवरून ( एम. एच. १७-इ क्यू. ८९४) कोल्हार येथून श्रीरामपूरमार्गे टाकळीभान येथे मित्राकडे जात होते. यावेळी त्यांच्या मोटार सायकलचा नेवासे येथून ऊस घेऊन श्रीरामपूरमार्गे संगमनेरकडे जात असणा-या ट्रकबरोबर {क्र. एम. एच. १७ टी ७६५५} जोराची धडक झाली. सदर धडकेत डोक्याला मार लागल्याने प्रा. शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. प्रा. शिंदे हे ठेकेदार रविंद्र शिंदे यांचे थोरले बंधू होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर कोल्हारच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.